5/10/2021

ये जवळी घे जवळी ..सखया भगवंता

ये जवळी घे जवळी
प्रिय सखया भगवंता
वेढुनि मज राहसी का
दूर दूर आता

रे सुंदर तव तीरी
जग हिरवे धुंद उरी
पातेंही न गवताचे
शोभवी मम माथा

निशिदिनी या नटुनी थटुनी
बघ नौका जाती दुरुनी
स्पर्शास्तव आतुर मी
दुर्लभ तो हाता

चमचमती लखलखती
तव मंदिरी दीप किती
झोपडीत अंधारी
वाचू कशी गाथा

गीत

-

वि. स. खांडेकर

संगीत

-

मीना खडीकर

स्वर

-

लता मंगेशकर

चित्रपट

-

माणसाला पंख असतात

No comments:

Post a Comment